डावखुऱ्या व्यक्तींबद्दल काही कमी ज्ञात असणारी तथ्ये


डावखुरे असणे हे नेहमीच सकरात्मक आणि नकारात्मक दृष्ट्याही वेगळेपणाचे लक्षण समजले जाते. जुन्या काळामध्ये तर डावखुरे असणाऱ्या व्यक्तींना बळजबरीने उजव्याच हाताचा वापर करावयाला भाग पडले जात असे. यामागे कारणे नक्की काय होती, आणि ती योग्य होती किंवा नाही, हे नेमके सांगता येणे अवघड आहे. पण डाव्या हातचा जास्त वापर सामान्य समजला जात नसे एवढे मात्र नक्की. आपल्या जगामध्ये अशी कितीतरी प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आहेत जी डावखुरी आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, बेन्जामिन फ्रँक्लिन, बराक ओबामा इत्यादी जगप्रसिद्ध व्यक्ती डावखुऱ्या आहेत.

शास्त्राद्यांनी डावखुरेपणा बद्दल अधिक अभ्यास केला असता, जगामधील दहा टक्के जनसंख्या डावखुरी असून, पुरुषांमध्ये डावखुरेपण स्त्रियांच्या मानाने जास्त असल्याचे स्पष्ट झाले. डावखुऱ्या व्यक्ती सामान्य समजल्या जात नसल्याने त्यांचे परिवारजन उजव्या हाताचा वापर करण्याबद्दल आग्रही असत. त्यामुळे जन्मजात डावखुरे असूनही कितीतरी व्यक्ती नंतर सवयीपोटी उजव्या हाताचा वापर करू लागल्याने ही संख्या कमी असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच डावखुरेपण अनुवांशिक नसल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

जगामध्ये दरवर्षी सुमारे अडीच हजार डावखुऱ्या व्यक्ती, तऱ्हतऱ्हेची उपकरणे किंवा यंत्रणा वापरताना अपघाताने मृत्युमुखी पडतात. यामागचे कारण असे, की ही उपकरणे उजव्याच बाजूने वापरता येतील या प्रकारे बनविली गेली असल्याने हे अपघात घडतात. उजव्या हाताला द्र्याव्हिंग व्हील असलेल्या गाड्या चालविल्याने गोंधळून जाऊनही अनके डावखुऱ्या व्यक्तींचे अपघातांमध्ये बळी गेलेले आहेत. तसेच खेळांशी संबंधित दुखापतींमध्ये डावखुऱ्या व्यक्तींना इजा होण्याची शक्यता जास्त असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात.

वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासांमध्ये हे निदर्शनास आले आहे की नियोजित वेळेआधी जन्मलेल्या अर्भकांमध्ये सुमारे चोपन्न टक्के अर्भके डावखुरी असतात. या मागे कारण असे सांगितले जाते, की वेळेआधी जन्मलेल्या मुलांमध्ये मेंदूतील उजवा भाग वापरण्यास प्रवृत्त करणाऱ्या न्युरॉन्सचा विकास पूर्णपणे झाला नसल्याने, ही वेळेआधी जन्मलेली मुले डावखुरी होण्याचा संभव असतो. पण याचा अर्थ असा मात्र नव्हे की डावखुऱ्या व्यक्ती कमी बुद्धिवान असतात. त्याउलट १४० पेक्षा अधिक बुद्ध्यांक ( आय क्यू ) असलेल्या लोकांमध्ये डावखुऱ्या व्यक्ती अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच विविध खेळ असोत किंवा कॉम्प्यूटर गेम्स असोत, डावखुऱ्या व्यक्ती ह्यामध्ये जास्त जलद गतीने प्रगती करताना आढळतात. डावखुऱ्या व्यक्तींचे आणखी एक स्वभाव वैशिष्ट्य असे, की कोणत्याही भीतीदायक गोष्टीचे भय त्यांना अधिक वाटते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच भीती बरोबर राग ही भावना देखील डावखुऱ्या लोकांमध्ये जास्त असते.

Leave a Comment