आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त स्मार्टफोन


मुंबई – आता आपल्या आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली असून त्यांच्या फोनची किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार असल्याची सध्या चर्चा आहे.

सर्वात आधी रिलायन्स जिओने स्वस्त फोन देण्याची योजना जाहीर केल्यानंतर एअरटेलनेही अशीच घोषणा केली. जिओच्या फोनची किंमत १,५00 रुपये, तर एअरटेलच्या फोनची किंमत १,३९९ रुपये आहे. या स्पर्धेत आता व्होडाफोन आणि आयडिया उतरल्या आहेत. लावा आणि कार्बन या हँडसेट उत्पादक कंपन्यांशी या कंपन्या चर्चा करीत आहेत. विशेष म्हणजे आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्या महाविलीनीकरणाच्या प्रक्रियेतही आहेत. या वृत्तास लावा आणि कार्बन या कंपन्यांच्या सूत्रांकडून दुजोरा मिळाला आहे. लावाचे उत्पादन प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले की, आम्ही तीनही कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

Leave a Comment