देशातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू


नवी दिल्ली – देशभरातील प्राध्यापकांना केंद्र सरकारने दिवाळी भेट दिली आहे. देशभरातील अनुदानित विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. त्यांनी ही घोषणा दिल्ली येथे पत्रकार परिषदेत केली. पूर्वलक्षी प्रभावाने १ जानेवारी २०१६ पासून प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे.

या निर्णयाचा लाभ देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना मिळणार आहे. २२ ते २८ टक्क्यांपर्यंत त्यांच्या पगारात वाढ होईल, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. केंद्राचे अनुदान असलेली १०६ विद्यापीठे, महाविद्यालये, राज्य सरकारचे अनुदान असलेली ३२९ विद्यापीठे, १२१९२ सरकारी व खासगी अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापक, सह प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

याचा फायदा आयआयआयटी, निटी, आयआयटी, आयआएम, आयआयएम, आयआयएसआरई, या सारख्या संस्थांमधील प्राध्यापकांनाही मिळणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. केंद्राच्या तिजोरीवर या निर्णयामुळे २२ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

Leave a Comment