जीएसटी साठी टॅलीकडून नवे सॉफ्टवेअर लाँच


टॅली सॉफटवेअर निर्माते टेली सोल्यूशन्सने मंगळवारी टॅली आयआरपी९ रिलीज केले असून ६.१.१ लाँच केले आहे. हे नवीन सॉफटवेअर जीएसटी रेडी अकौंटींग सॉफ्टवेअर असून छोट्या व मध्यम उद्योग व्यावसायिकांसाठी ते उतिशय उपयुक्त ठरणार आहे. ज्यांचा व्यवसाय वर्षाला दीड कोटींच्या दरम्यान आहे त्यांना हे सॉफटवेअर जीएसटी रिटर्न दाखल करण्यासाठी मदत करेल.

टॅली सोल्यूशन्सचे प्रमुख भारत गोयंका या संदर्भात म्हणाले की या सॉफटवेअरच्या मदतीने जीएसटी रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया एकदमच सोपी व सुलभ होणार आहे. आम्ही जीएसटीएन सह काम करणार असून गरजेनुसार या सॉफटवेअरची नवी रिलीजही जारी करणार आहोत. नोंदणी नसलेल्या डीलर कडून व्यायसायिकांनी सामान खरेदी केले असेल तर जीएसटीआर फायलिंगमध्ये जीएसटीची मोजणी होणार नाही.

Leave a Comment