शाओमीचा एमआय मिक्स २ स्मार्टफोन लाँच


नवी दिल्ली : भारतात एमआय मिक्स २ हा फ्लॅगशिप स्मार्टफोन शाओमीने लाँच केला असून या वर्षातील कंपनीचा हा पहिलाच फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. ३५ हजार रुपये ऐवढी या फोनची किंमत ठेवण्यात आली असून हा फोन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात फ्लिपकार्ट आणि Mi.com वर खरेदी करता येईल.

एमआय मिक्स २ भारतात ६जीबी रॅम आणि १२८जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचे इतर दोन व्हेरिएंट कधी लाँच करण्यात येतील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा फोन चीनमध्ये रॅम आणि स्टोरेज आधारावर वेगवेगळ्या तीन व्हेरिएंटवर लाँच करण्यात आला आहे. ६जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३२९९ युआन (जवळपास ३२ हजार ३०० रुपये), ६जीबी रॅम आणि १२८जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३५९९ युआन (जवळपास ३२ हजार ३०० रुपये), तर ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९९९ युआन (जवळपास ३९ हजार २०० रुपये) एवढी आहे.

Leave a Comment