Skip links

जिओ देणार १४९ रुपयात अनलिमिटेड डाटा


नवी दिल्ली : आपल्या योजनेत पुन्हा ग्राहकांना परवडणारी व्हॉईस आणि डेटा प्लान पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने बदल केले असून कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेल्या एका वर्षात अनेक अनेक प्लान लॉंच केले तर काही प्लानमध्ये बदल केले. सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन जिओफाय डिव्हाइसवर ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑफर देऊ केल्यानंतर, जिओपासूनच्या टेरिफ प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. १४९ रुपयांच्या प्लानमध्ये कंपनीने सर्वात मोठा बदल केला आहे.

नवीन योजनेअंतर्गत १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी ४ जी इंटरनेट, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्स मेंबरशिपही देण्यात येणार आहे. या प्लॅनच्या अंतर्गत २ जीबी डेटा संपल्यानंतर देखील आपली इंटरनेट सेवा सुरूच राहणार आहे. तसेच हे इंटरनेट स्पीड ४ जीपासून कमी होऊन ६४ केबीपीएसपर्यंत होईल तरीही इंटरनेटचा वापर करता येणार आहे. जुन्या १४९ रुपयांचा डेटा प्लान संपल्यानंतर तर कोणताही डेटा दिला जात नव्हता. कंपनीच्या अन्य प्लानमध्ये असलेली ही सुविधा रु. १४९ च्या प्लानमध्ये नव्हती. जिओच्या इतर प्लानमध्ये निर्धआरित डाटा संपल्यावर १२८ केबीपीएस स्पीड मिळतो.

अनलिमिटेड कॉलिंगचा जे ग्राहक गैरफायदा घेत आहेत, त्यांच्यासाठीच ३०० मिनिटाचे लिमिट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक दिवसासाठी हे ३०० मिनिटाचे लिमिट असणार आहे. अनेक जण जिओचे कार्ड वापरून दिवसाला १० तासांपेक्षा जास्त बोलत आहेत. यामध्ये मार्केटिंग आणि प्रमोशनल कॉलचाही वापर होत आहे. हा गैरवापर रोखण्यासाठी अशा ग्राहकांना जिओ ३०० मिनीटेच फ्री देणार आहे. फ्री कॉलिंगची सुविधा ही फक्त वैयक्तिक वापरासाठी आहे. त्याचा व्यावसायिक वापर होत असेल तर अशा ग्राहकांवर ३०० मिनिटाचे लिमिट जिओ टाकणार आहे.

Web Title: Jio offer Unlimited data in the price of Rs 149