व्होडाफोनचा नवा रेड प्लॅन


मुंबई : आपल्या पोस्टपेड यूजर्सला जिओ आणि एअरटेलने फ्री डेटा ऑफर दिल्यामुळे व्होडाफोनने देखील आता अशाच एका ऑफरची घोषणा केली आहे. आपल्या पोस्टपेड यूजर्सला व्होडाफोन ६० जीबी फ्री डेटा देणार आहे. ही ऑफर सर्व व्होडाफोन रेड यूजर्ससाठी असणार आहे.

यूजर्सला या ऑफरमध्ये प्रत्येक महिन्याला १० जीबी डेटा पुढील सहा महिन्यांसाठी मिळणार आहे. म्हणजेच तब्बल ६० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. व्होडाफोन रेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरु होतो. ज्यामध्ये फ्री डेटाशिवाय ५ जीबीचा ज्यादा डेटा मिळणार आहे.

बाजारात रिलायन्स जिओ आल्यापासून स्वस्त डेटा आणि फ्री कॉलिंग असे नवे प्लॅन यूजर्ससाठी आणले गेल्यामुळेच या कंपन्यांनी आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठीही स्वस्त प्लॅन आणले आहेत. दुसरीकडे एअरटेल टीव्ही आणि जिओ टीव्हीला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने देखील आपल्या काही खास प्लॅनवर नेटफ्लिक्सचे सब्सक्रीप्शन मोफत देत आहे. १२९९ आणि १६९९ रुपयांच्या प्लॅनवर दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्सचे सब्सक्रीप्शन मिळेल.

Leave a Comment