पोर्शने लाँच केली २.३१ कोटींची आलिशान कार


मुंबई : भारतात पोर्श या कार उत्पादक कंपनी आपली ९११ जीटी ३ ही आलिशान कार लाँच केली असून २.३१ कोटी रुपये (एक्स-शोरुम) ऐवढी या कारची किंमत आहे. थोडा या कारच्या लूकमध्येही बदल करण्यात आला आहे.

४.० लीटरचे फ्लॅट-६ इंजिन पोर्श९११ जीटी ३ मध्ये लावण्यात आले असून ज्यामध्ये ५०० पीएस पॉवर आणि ४६० एनएमचे टॉर्क देण्यात आले आहे. या इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ३१८ किमी प्रति तास एवढा या कारचा टॉप स्पीड आहे. तर अवघ्या ३.४ सेकंदात ही कार १०० चा स्पीड घेते. या कारमध्ये पॉवरफुल इंजिनशिवाय रिअर-एक्सल स्टिअरिंग आणि रेसिंग चेसिस देखील देण्यात आले आहे. तसेच मागील स्पॉइलरदेखील खास पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. या कारमधील अनेक नव्या फीचरमुळे ती अधिक आकर्षक दिसते.

Leave a Comment