रघुराम राजन यांना मिळू शकतो अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार


मुंबई : यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना मिळण्याची दाट शक्यता असून नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी क्लॅरेवेट ऍनालिटिक्स या संस्थेने तयार केली असून त्यात रघुराम राजन यांच्या नावाचा समावेश आहे.

क्लॅरेवेट ऍनालिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था असून आपल्या संशोधनावरून ते नोबेल पुरस्कारांच्या संभावित विजेत्यांची यादी तयार करतात. राजन यांचा या यादीत समावेश कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल करण्यात आला आहे. रघुराम राजन यांना नोबेल पुरस्कार मिळाला तर अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळवणारे ते अमर्त्यसेन यांच्यानंतरचे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ ठरतील.

Leave a Comment