इलेक्ट्रीक वाहन स्पर्धेत टाटा-महिंद्रा आमनेसामने


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी २०३० सालापर्यंत देशात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर १०० टक्कयांवर नेण्याची घोषणा केली असताना अनेक वाहन कंपन्यांनी इलेक्ट्रीक वाहन बाजारात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात टाटा मोटर्स व महिंद्रा अॅन्ड महिंद्रा या कंपन्यांनी आघाडी घेतली असून या दोन कंपन्या एकमेकींच्या प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या राहिैल्या आहेत. महिंद्राने या क्षेत्रात येत्या पाच वर्षात ३५०० ते ४ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे उदिष्ट ठेवले असताना टाटाने सरकारकडून १० हजार इलेक्ट्रीक कार्सचे कंत्राट पदरात पाडून घेतले आहे.

टाटा त्यांच्या ब्रिटनमधील जग्वार व लँड रोव्हर सह या क्षेत्रात विकासाचे प्रयत्न करत असून त्यांनी इलेक्ट्रीक हायब्रीड, सीएनजी हायब्रीड कार्सवर लक्ष ठेवले आहे. तर जग्वार व लँड रोव्हर विनाचालक कार्स क्षेत्रात गुंतवणूक करत आहे. टाटा व महिंद्रा यांच्यातील स्पर्धेमुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत मिळणार असून त्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे. महिंद्रा दोन वर्षात दोन इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणत असून सध्या त्यांची तीन इलेक्ट्रीक वाहने बाजारात आहेत.

Leave a Comment