फेसबुकचा पासवर्ड विसरलात ‘नो टेन्शन’!


मुंबई : सध्याच्या घडीला सोशल मीडिया म्हणजे तरुणाईचा जीव की प्राण होऊन बसला आहे. त्यात त्यांचे मेल, फेसबुक, ट्विटर आपले इतके अकाऊंट असतात की सगळ्याचा पासवर्ड लक्षात ठेवणे त्यांच्यासाठी जिकरीचे होते. आपण काही वेळा एखादा पासवर्ड विसरतो. मग नवीन पासवर्डची मागणी करून अकाऊंट अनलॉक करतो. काहीवेळा जवळच्या व्यक्तीला देखील पासवर्ड सांगणे त्रासदायक ठरू शकते. मात्र आता तुमच्या या सगळ्या अडचणींवर उपाय सापडला आहे.

सध्या फेस रिकग्नेशन या नव्या पर्यायाची फेसबुक चाचणी करत असल्यामुळे युजर्सना आपला चेहरा स्कॅन करून फेसबुकवर लॉगिंग करू शकता. फेसबुकच्या या नव्या फीचरबद्दलची माहिती ‘टेकक्रंच’ने दिली आहे. हे फिचर फेसबुकसाठी काही नवीन नाही. कारण मित्र मैत्रिणीसोबतच्या तुमच्या फोटोत त्यांची नावे फेसबुक अचूक ओळखतो. त्यामुळे मित्रांना टॅग करताना नावे शोधावी लागत नाही. हेच फिचर आता फेसबुकवर लॉग इन करण्यासाठी करता येईल का ? याची चाचणी सुरु आहे. युजर्ससाठी हे फीचर कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र याबद्दल युजर्सना उत्सुकता आहे.

Leave a Comment