एअरटेल देणार दररोज ४ जीबी डेटा


नवी दिल्ली : इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिलायन्स जिओ च्या ४जी डेटा प्लॅनला टक्कर देण्यासाठी अनेक नवनवीन आणि आकर्षक ऑफर्स बाजारात आणल्या. गेल्या काही दिवसात वोडाफोन, एअरटेल आणि आयडीया यांच्यातर्फे अनेक ऑफर्स आल्या. भारती एअरटेलने त्यानंतर आपला नवीन प्लॅन लाँच केला. ग्राहकांना यामध्ये दररोज ४ जीबी डेटा मिळेल. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये आतापर्यंतच्या प्लॅनपेक्षा सर्वाधिक इंटरनेट डेटा मिळत आहे.

जिओच्या कोणत्याही प्लॅनपेक्षा सर्वाधिक इंटरनेट डेटा या प्लॅनमध्ये दररोज मिळेल. जिओच्या कोणत्याही ऑफर्सपेक्षा ही ऑफर अधिक चांगली ठरेल. एअरटेलच्या नव्या प्लॅनमध्ये ९९९ रुपयांमध्ये दररोज ४जीबी ४जी डेटा मिळेल. याशिवाय एअरटेलने अनेक प्लॅन सादर केले आहेत. यात ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

एअरटेलच्या ९९९ रुपयांच्या पॅकेजमध्ये दररोज ४जीबी ४जी डाटा मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असेल. त्याचबरोबर युजर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉल देखील दिले जातील. ४जी आणि ३जी या दोन्ही युजर्सना या प्लॅनचा फायदा होईल.

Leave a Comment