यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांना जाहीर


स्टॉकहोम – आज यंदाचे जॅक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रॅंक आणि रिचर्ड हेंडरसन यांना रसायनशास्त्राचे नोबेल देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परवापासून जगातील सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होत असून पदार्थविज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कार काल जाहीर झाल्यानंतर रसायनशास्त्राचे नोबेल सन्मान आज जाहीर करण्यात आले.

पदार्थाच्या जैवरेणूंची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी ड्युबोशे, फ्रॅंक आणि हेंडरसन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान नोबेल समिती करत असल्याचे जाहीर करण्यात आले. संशोधकांना जैवरेणू गोठवून अभ्यास करणे त्यांच्या संशोधनामुळे सोपे जाणार आहे.

Leave a Comment