रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही


नवी दिल्ली – चालू आर्थिक वर्षातील चौथे द्विमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेने बुधवारी जाहीर केले असून कोणतेही बदल रेपो रेटमध्ये करण्यात आलेले नाही. रिझर्व्ह बँकेने व्याजदर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे स्थिर ठेवले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने गेल्या द्विमासिक पतधोरणात रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. पण रेपो रेट यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासूनच होती. पतधोरण समितीच्या बैठकीला मंगळवारपासून सुरुवात झाली होती. ही बैठक आज संपल्यानंतर पतधोरण रिझर्व्ह बँकेने जाहीर केले. पतधोरण समितीने रेपो रेट अपेक्षेनुसार कायम ठेवले आहे. यानुसार रेपो दर ६ टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर कायम आहे. विकासदर ६.७ टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बॅंकेने वर्तविले. यापूर्वी हाच अंदा ७.३ टक्के इतका वर्तविण्यात आला होता.

Leave a Comment