जिओ देणार १४९ रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड डेटा


वर्षपूर्तीनिमित्त आता रिलायन्स जिओने ऑफर आणली असून सध्या याची सुरुवात सुरु असलेल्या १४९ रुपयांच्या रिचार्जमध्ये काही बदल करुन करण्यात आली आहे. २ जीबी ४जी इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएस आणि मोबाईल अॅप अॅक्सेस जिओच्या १४९ रुपयांच्या रिचार्जमध्ये मिळते. पण आता २ जीबी डेटा संपल्यानंतरही नेट बंद होणार नाही. तर इंटरनेट ६४kbps स्पीडने सुरुच ठेवले जाईल. त्यामुळे यूजर्सच्या इंटरनेट सर्फिंगमध्ये अडथळा येणार नाही.

हे बदल करुन नव्याने जिओने काही आणले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण इतर काही टेलिकॉम कंपन्यांनी याआधीच अशाप्रकारची ऑफर अंमलात आणली आहे. पण जिओ यूजर्सचा विचार करता, त्यांच्यासाठी नक्कीच खुशखबर म्हणता येईल. गेल्या एक वर्षात अनेक टेलिकॉम कंपन्यांना रिलायन्स जिओने मोठ-मोठे धक्के दिले आहेत. यूजर्सना त्वरित आकर्षित करणाऱ्या ऑफर्स जिओने बाजारात आणल्यामुळे स्मार्टफोन वापरणारा एक मोठा वर्ग जिओकडे कमी कालावधीत वळला.

Leave a Comment