उत्तरप्रदेश पर्यटन योजना विकासात ताजमहाल गायब


नवी दिल्ली – उत्तर प्रदेश सरकारने भविष्यातील पर्यटन योजनाबाबत एक पुस्तिका प्रकाशित केली आहे. यात ताजमहालबाबत काहीही माहिती नसल्याने वाद निर्माण झाला आहे.

टाइम्स ऑफ़ इंडियाच्या वृत्तानुसार विरोधी पक्षांनी उत्तरप्रदेशच्या सरकारवर धर्मवादी सरकार म्हणून टीका केली होती. त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने एक पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला होता.

उत्तरप्रदेश सरकारच्या माहिती आणि प्रसारणमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात सांगितले आहे की सरकारने जागतिक बॅंकेच्या सहकार्यांने ताजमहल, आणि परिसराचा विकासासाठी 156 कोटी रूपयांची विकास योजना प्रस्तावित केली आहे.

गेल्या आठवड्यात राज्याच्या पर्यटनमंत्री रीता बहुगुणा यांनी ‘उत्तर प्रदेश पर्यटन: अपार संभावनाएं’ या पुस्तिकेव्दारे उत्तरप्रदेशातील विविध पर्यटनस्थळाचा माहिती, छायाचित्र प्रसिद्ध केले आहेत. पण या पुस्तिकेतून ताजमहल गायब झाला आहे. बिहार मधील दरभंगा येथील रॅलीत मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले होते की विदेशी व्यक्तींना ताजमहालाची प्रतिकृती भेट देणे ही भारतीय संस्कृती नाही.

Leave a Comment