टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने खळबळ माजवली असतानाच एअरटेलनेही आता जिओला टक्कर देण्यासाठी आपले अनोखे प्लॅन्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने नुकताच एक १९९ रुपयांचा प्लॅन जाहीर केला असून, या प्लॅनचा लाभ आता एअरटेलची सेवा वापरत असलेल्या ग्राहकांना घेता येणार आहे. १ जीबी डेटा यामध्ये मिळणार असून, अनलिमिटेड कॉलची सुविधा देखील मिळणार आहे.
एअरटेलचा १९९ रुपयांचा नवा प्लान देणार जिओला टक्कर
एअरटेलच्या ठराविक यूजर्ससाठीच सुरुवातीला हा नवीन १९९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध असेल. तर एअरटेलचे नव्याने ग्राहक होणाऱ्यांसाठी कंपनीने १७८ आणि १७९ रुपयांचे दोन नवीन प्लॅन जाहीर केले आहेत. पण १९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सुविधा ग्राहकांना १७८ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळू शकणार आहेत. हे सगळे प्लॅन्स २८ दिवसांसाठी वैध असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.