व्हॉट्सअॅपने लाँच केले ३ नवे फीचर्स !


नवी दिल्ली : सातत्याने नवनवीन बदल होणाऱ्या आणि सर्वाधिक वापरल्या जाणा-या मेसेंजिंग अॅप म्हणजे व्हॉट्स अॅपमध्ये युजर्ससाठी कंपनीने अजून काही नवीन फीचर्स लाँच केले आहेत.

व्हॉट्सअॅपमध्ये आपल्याला इतरांचा डीपी बघण्यात खूप रस असतो. पण आपण हा डीपी झूम करून पाहू शकत नाही. आता या नव्या फीचरमुळे ते शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा युजर्ससाठी सध्या हे फीचर उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

आपल्याला एखाद्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज व्हॉट्सअॅपवर आल्यास आपल्याकडे तो नंबर सेव्ह नसल्यामुळे त्या व्यक्तीचे नाव आपल्याला कळू शकत नाही. म्हणजेच आतापर्यंत नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीचे नाव आपल्याला कळत नव्हते. पण लवकरच हे फीचर देखील युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्यामुळे एखाद्या अनोळखी व्यक्तीने मेसेज केल्यास नाव आपोआप रजिस्टर होईल आणि ते नाव तुम्हाला कळेल.

व्हॉट्सअॅप स्टेटस म्हणून युजर्स आतापर्यंत फोटो आणि GIF वापरू शकत होते. आता हे फीचर अधिक रंजक होणार असून तुम्ही या नव्या फीचरमुळे कलरफुल स्टेटस ठेऊ शकाल. याचा ऑप्शन तुम्हाला स्टेटसमध्ये उपलब्ध होईल. हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध असेल.

Leave a Comment