नवी दिल्ली – ग्राहकांना एसबीआय, बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकांनी दिवाळी भेट देत कर्जाच्या व्याजदरात (बेस रेट) कपात केल्यामुळे या बँकांकडून कर्ज घेतले असल्यास ईएमआय कमी भरावा लागणार आहे. १ ऑक्टोबरपासून हे नवीन दर लागू होतील.
चार बँकांनी केली कर्ज व्याजदरात कपात
०.०५ टक्क्यांनी एसबीआयने बेस रेट कमी केले आहेत. एसबीआयचा बेस रेट ९ टक्क्यांवरून ८.९५ टक्क्यांवर पोहोचला. बँक ऑफ बडोदाने बेस रेटमध्ये ०.३५ टक्क्यांनी कपात केली. या बँकेचा बेस रेट ९.५० टक्क्यांवरून ९.१५ टक्क्यांवर आला. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सने बेस रेट ०.०५ टक्क्यांनी कमी केल्याने ९.५० टक्क्यांवरून ९.४५ टक्क्यांवर बेस रेट पोहोचला आहे. देना बँकेने १५ ते २० बेसिस पाँईन्टने व्याजदरात कपात केली. नवीन कर्ज व्याजदर ८ ते ८.२५ टक्क्यांदरम्यान असेल. बेस रेटमध्ये कपात करण्यात आल्याने जुन्या ग्राहकांनाही फायदा होईल. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, ओरिएन्टल बँक ऑफ बडोदा, देना बँकेच्या ग्राहकांनी गृह कर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेतल्यास ईएमआय कमी होईल.