
मुंबई : आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवा प्लॅन भारतातली सगळ्यात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी एअरटेलने लॉन्च केला आहे. एअरटेलने हा प्लॅन रिलायन्स जिओच्या ९९९ रुपयांमध्ये ९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगच्या ९० दिवसांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आणला आहे.
९९९ रुपयांमध्ये दिवसाला ४जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देणार एअरटेल
ग्राहकांना या प्लॅननुसार दिवसाला ४जीबी ३जी/४जी डेटा २८ दिवसांसाठी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना २८ दिवसांसाठी ११२जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. हा प्लॅन सुरू करण्यासाठी ग्राहकांना ९९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. तसेच एअरटेल पेमेंट बँकच्या माध्यमातून रिचार्ज करणाऱ्यांना ५० टक्के डिस्काऊंट देण्यात येणार आहे.
ठराविक ग्राहकांसाठीच एअरटेलचा हा प्लॅन असणार आहे. तुमच्या नंबरवर हा प्लॅन उपलब्ध आहे का नाही ते पाहण्यासाठी माय एअरटेल अॅप चेक करावे लागणार आहे.
