रशियाचा टैगा स्मार्टफोन देणार आयफोनला टक्कर


मुंबई : आपला टैगा हा नवा स्मार्टफोन रशियन सॉफ्टवेअर कंपनी इन्फोवॉच ग्रुपने ‘सर्व्हिलांस-प्रूफ’ बाजारात आणला असून १६,९०० रुपये ऐवढी याची किमत आहे. यासोबत कंपनीने असा दावा केला आहे की, आमच्या फोनमध्ये ग्राहकाला गोपनीयतेच संरक्षण मिळेल.

रशियन वन ‘टैगा’ चे प्रतिनिधीत्व करण्यासाठी फोनचा रंग हिरवा ठेवण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ इंच टचस्क्रीन, दोन सिम स्लॉट्स आणि एक ड्युअल कॅमेरा आहे. या फोनचा सर्वात जास्त धोका चीनला आहे. कारण या फोनचे कोणतेही फिचर्स चीनी कंपन्या तयार करु शकत नाही. अद्याप कोणत्याही चीनी फोनमध्ये टैगामधील वैशिष्ट्ये नाही. रशियन कंपनीने जर भारतीय मोबाईल बाजारपेठेत पाऊल टाकले तर हे रशियन उत्पादन हातोहात संपेल. टैगा फोनची वैशिष्ट्य म्हणजे आयफोन पेक्षा त्याची फिचर्स चांगली आहेत आणि किंमत आयफोन पेक्षा खूप कमी आहे.

Leave a Comment