देशातील सर्वात स्वस्त फोन इनोवू फक्त ३४९ रूपयांत


दसरा दिवाळीच्या निमित्ताने अनेक ई कॉमर्स कंपन्यांनी डिस्काऊंट व ऑफर्सचा वर्षाव ग्राहकांवर सुरू केला असतानाच देशातील सर्वात स्वस्त फोन शॉपक्लूज या ऑनलाईन शॉपिंग साईटने उपलब्ध करून दिला आहे. या कंपनीने भारतातील सर्वात स्वस्त फोन इनोव्हू केवळ ३४९ रूपयांत उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर याच फोनची ३६९ व ४९९ रूपयांची व्हर्जनही उपलब्ध करून दिली आहेत.

हे फोन खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रमाणेच कॅश ऑन डिलिव्हरी सुविधाही दिली गेली आहे. ३४९ रूपये किंमतीच्या इनोवूसाठी १.८ इंची स्क्रीन, सिंगल सिम, ३२ एमबी रॅम, ६४ एमबी स्टोरेज असून हा टू जी फोन आहे. त्याला एफएम व टॉर्चही दिली गेली आहे. ३६९ रूपयाच्या फोनसाठी १.४४ इंची डिस्प्ले, दिला गेला आहे तर ४९९ रूपयांच्या फोनसाठी दोन सिम, कॅमेरा, ब्ल्यू टूथ, एफएम व १.८ इंची डिस्प्ले आहे. या फोनची मेमरी ८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे व त्याची रॅम ३२ एमबी आहे. हा टू जी फोन आहे.

Leave a Comment