आता फक्त एका क्लिकवर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक


अमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने फेसबुकच्या अॅपवरच आता व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या फेसबुककडून चाचणी घेण्यात येत आहे. या बटणाच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांना एका क्लिकवर व्हॉट्सअॅप सुरु करता येईल असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. सध्या हे फिचर फेसबुकचे अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्या काहींसाठी उपलब्ध आहे. हे बटण सध्या डॅनिश भाषेत आहे. पण अद्याप फेसबुकने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण फेसबुकवर दिल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही सुविधांचा वापर करणाऱ्यांना होईल. फेसबुक अॅप बंद न करता यामुळे फक्त एका क्लिकवर व्हॉट्सअॅपवर जाता येईल. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सेवांना याचा फायदा होणार आहे. फेसबुक आपली सहयोगी कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे वापरकर्ते या फिचरमुळे वाढवू शकते. याशिवाय केवळ व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांनाही फेसबुककडे वळवण्याचा कंपनीचा प्रयत्न असू शकतो.

Leave a Comment