भारतीयांना कौशल्यविकास प्रशिक्षण देणार मायक्रोसॉफ्ट


नवी दिल्ली – भारतातील ४ हजार स्टार्टअप्सना गेल्या वर्षभरात मायक्रोसॉफ्टने मदत केली. याव्यतिरिक्त ३० हजार युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण आणि २६ हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास मदत केली. कंपनीने यासाठी अनेक राज्य सरकार आणि बिगर सरकारी संस्थांची मदत घेतली होती. कंपनीकडून भारतीयांना एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान प्रशिक्षण देण्यात आल्याचे अहवालात म्हणण्यात आले आहे.

२०१७ इंडिया सिटिझनशिप रिपोर्ट मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून जाहीर करण्यात आला. उद्योग क्षेत्रातील भारतीयांमधील आवड पाहता त्याचा देशाच्या आर्थिक विकासासाठी मदत होण्यासाठी आणि देशातील स्टार्टअप्सना मदत करण्यासाठीच्या ध्येयाने कंपनीकडून कौशल्य असणा-या लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. कंपनीकडून बिझस्पार्क, मायक्रोसॉफ्ट अस्सेलेरटेर यासारख्या उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता.

नव्यानेच सुरू झालेल्या स्टार्टअप्सना बिगस्पार्क या मायक्रोसॉफ्टच्या उपक्रमांतर्गत मदत करण्यात येते. २०१६-१७ मध्ये बिझस्पार्क प्लस उपक्रमांतर्गत १०० पेक्षा अधिक भारतीय स्टार्टअप्सची निवड करण्यात आली होती. या स्टार्टअप्सच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होण्यासाठी मदत करण्यात आली आहे. मायक्रोसॉप्ट अस्सेलेरटेर या उपक्रमांतर्गत स्टार्टअप्सना मोठय़ा कंपन्यांमध्ये बदलण्यासाठी, बाजारानुसार काम करण्यासाठी आणि संसाधने, ज्ञान, अनुभव यांच्या माध्यमातून यशस्वी कंपनी बनण्यासाठी मदत करतात.

Leave a Comment