उद्यापासून तुमच्या हाती पडेल जिओचा नवा मोफत फोन


नवी दिल्ली – आता जगातील सर्वांत स्वस्त ४जी स्मार्टफोन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्सच्या जिओने लॉन्च केला आहे. यापूर्वीच फोनची बुकिंग कंपनीकडून सुरु करण्यात आली होती. उद्यापासून (रविवार) टप्प्याटप्प्याने या फोनची बुकिंग केलेल्या या ग्राहकांना डिलिव्हरी मिळणार आहे.

आपला हा बहुचर्चित जिओ ४G स्मार्टफोन रिलायन्सने १५०० रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. २४ ऑगस्टपासून सुरु करण्यात आलेल्या या फोनच्या प्री-बुकिंगवेळी इच्छुकांना ५०० रुपये भरावे लागले होते. त्यानंतर डिलिव्हरीच्यावेळी त्यांना आता १००० रुपये द्यावे लागणार आहेत.

ग्रामीण भागात जास्तीत जास्त या फोनचा प्रसार व्हावा यासाठी आधी ग्रामीण भागात या फोन्सची डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यानंतर शहरी भागातील ग्राहकांसाठी हा फोन उपलब्ध होणार आहे. येत्या १५ दिवसांत बुकिंग झालेल्या सुमारे ६० लाख फोन्सची डिलिव्हरी करण्यात येणार आहे. त्यांनतर पुढच्या टप्प्यातील बुकिंगला सुरुवात होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Comment