पुढील आठवड्यात बँकांच्या कामात करू नका टंगळमंगळ


मुंबई – बँकेचे व्यवहार पुढच्या आठवडयात वेळेत करणे ग्राहकांच्या फायद्याचे असेल. कारण पुढच्या आठवडयात बँका बंद सलग तीन दिवस असणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बँकांच्या कामात टंगळमंगळ करू नका. अन्यथा सणाच्या दिवशी बँक खात्यात पैसे असूनही तुम्ही अडचणीत येऊ शकता.

पुढील आठवडयात दस-या निमित्त बँका ३० सप्टेंबरला शनिवारी बंद असतील. त्यानंतर १ ऑक्टोंबर रविवार आहे तर, २ ऑक्टोंबरला सर्वत्र गांधी जयंतीची सुट्टी असेल. त्यामुळे सलग तीन दिवस तुम्हाला बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत. आता सर्वच बँकांच्या बहुसंख्य खातेदारांकडे एटीएम कार्डचा पर्याय उपलब्ध आहे. पण सर्वच बँका बंद असल्याने कॅशसाठी ग्राहक एटीएमचा वापर करतील. अशावेळी कदाचित जवळच्या एटीएममध्ये कॅश संपल्यामुळे तुम्हाला पायपीट करावी लागू शकते. त्यामुळे येत्या आठवडयात बँकेचे सर्व व्यवहार वेळीच मार्गी लावणे ग्राहकाच्या फायद्याचे आहे.

Leave a Comment