शाओमी दिवाळी सेल-१ रूपयांत स्मार्टफोन मिळविण्याची संधी


शाओमीने दिवाळीच्या निमित्ताने २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या तीन दिवसांचा सेल जाहीर केला आहे. या काळात ग्राहकांना शोओमीची अनेक उत्पादने अत्यंत कमी किंमतीत मिळणार असून त्यात शोओमीच्या रेडमी नोट ४, मी मॅक्स २ या सर्वाधिक खप असलेल्या स्मार्टफोनचाही समावेश आहे. अॅमेझॉन व फ्लिपकार्टच्या सेलपेक्षाही कमी किंमतीत शोओमीची उत्पादने येथे खरेदी करण्याची संधी ग्राहकांना कंपनीने दिली आहे. सेलमध्ये ज्या किंमतीत उत्पादने विकली जाणार आहेत त्याची लिस्ट मीडॉट कॉमवर दिली गेली आहे.

रेडमी, नोट ४, नव्याने सादर झालेल्या लेक ब्ल्यू एडिशनसह येथे स्वस्तात उपलब्ध केला गेला आहेच शिवाय मी मॅकस २, अँड्राईड वन, मी ए १, यांचाही त्यात समावेश आहे. सकाळी ११ व सायंकाळी पाच वाजता फ्लॅश सेल असून त्यात १ रूपयांत हे फोन मिळविण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. एचआर एक्स एडिशन बँड, इअरफोन, पॉवर बँक ही उत्पादनेही स्वस्तात विकली जाणार आहेत. मेंबर्ससाठी डिस्काऊंट कूपन व एफ कोड ऑफरही दिल्या जात आहेत.त्याची माहिती वेबसाईटवर दिली गेली आहे.

Leave a Comment