ब्लॅक टी चे फायदे


चहा हा आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा दिवस चहानेच सुरू होतो. अनेकांना तासातासाला चहा प्यावासा वाटतो. चहा हा आपल्या आदरातिथ्याचा भाग झाला आहे. पण चहा हा काही एका प्रकारचा नसतो. चहाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला ब्लॅक टी हा चहाचा प्रकार केवळ फ्रेशनेससाठी नाही तर औषध म्हणून प्राशन केला जातो. ब्लॅक टी हा अनेक प्रकारांनी आपल्या आरोग्याला उपकारक ठरतो. सकाळी हा ब्लॅक टी प्याल्यास अनेक प्रकारच्या रोगांपासून आपली सुटका होते. मात्र हा ब्लॅक टी आपल्या नेहमीच्या चहाप्रमाणे दूध घालून तयार करीत नाहीत. तो दुधाशिवाय केला जात असतो. काही लोक तर हा चहा साखरही न घालता करीत असतात.

ब्लॅक टी हा आपल्या हृदयाला फार गुणकारी असतो. हा चहा प्याल्याने आपले हृदय निरोगी आणि बळकट रहाते. दररोज दोन ते तीन कप ब्लॅक टी प्राशन करण्याने आपण प्रोस्ट्रेट, फुफ्फुस आणि किडनी यांच्या कर्करोगापासून मुक्त राहू शकतो. मेंदूच्या पेशींनाही हा चहा प्रेरणा देतो. काळा चहा प्याल्याने मेंदूच्या पेशींना रक्ताचा पुरवठा वाढतो. दिवसातून चार वेळा हा चहा प्राशन केला तर सगळ्या प्रकारच्या तणावापासून सुटका होते. या चहात टॅनीन हे द्रव्य असते आणि ते आपल्या पचन संस्थेला गुणकारी ठरते. पचनाची ताकद वाढवते आणि गॅसेस वगळता पचन संस्थेचे अनेक दोष दूर करण्यास ते उपयोगी ठरते.

या चहाचे परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. चहा प्याल्याने त्वचेवर पडणार्‍या सुरकुत्या कमी होतात. संसर्गासारखे त्चचेचे त्रास या चहाने कमी होतात. काही लोक हा चहा सकाळी पितात. तो स्वत: गुणकारी तर असतोच पण त्याच्या या गुणांवर कसलाही परिणाम न करता त्यात काही औषधी घालताही येतात. ब्लॅक चहा तयार करताना त्यात गवती चहा मिसळावा त्यामुळे अंगातले लहान मोठे ताप आणि मरगळ कमी होते. याच चहात तुळशीचे बी घातल्यास खोकला, सर्दी असे आजार दूर पळतात. एरवी तुळशीचे बी फार गुणकारी आहे पण ते आपण नुसतेच काढ्याच्या स्वरूपात घेऊ शकत नाही. तेव्हा साखर घालून केलेल्या ब्लॅक टी मध्ये थोडेसे बी मिसळावे. ब्लॅक टी चे फायदे तर होतीलच पण त्यात घातलेल्या तुळशीच्या बियाचेही फायदे होतील. तर असा आहे हा अती गुणकारी ब्लॅक चहा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment