बेनामी संपत्तीची माहिती देणार्‍यास १ कोटींचे इनाम


बेनामी संपत्ती बाळगणार्‍यांविरोधात केंद्र सरकारने अधिक कडक पावले टाकली असून या संदर्भातली नवी योजना आक्टोबर अखेरी जाहीर केली जाणार असल्याचे समजते. या योजनेनुसार बेनामी संपत्ती संदर्भात माहिती देणार्‍यांना १५ लाख ते १ कोटी रूपयांपर्यंतचे इनाम दिले जाणार असून माहिती देणार्‍याचे नांव गुप्त राखले जाणार आहे त्याचबरोबर त्याच्या सुरक्षेची काळजीही सरकार घेणार आहे.

आयकर विभागाकडून करचुकवेगिरी करण्यांसंदर्भात माहिती देणार्‍यांना बक्षीसे दिली जातात मात्र ही उपाययोजना पुरेशी ठरलेली नसल्याचे दिसून आले आहे. सरकारी यंत्रणांना अशा लोकांचा शोध घेणे अवघड बनते. आयकर विभागाकडून पकडल्या गेलेल्या रकमेचा कही भाग माहिती देणार्‍यांना बक्षीस स्वरूपात दिला जातो मात्र नव्या योजनेमुळे बेनामी संपत्ती मालकांचा पत्ता अधिक सहजतेने मिळविणे सोपे होणार असल्याचे वित्त मंत्रालयाचे म्हणणे आहे. अर्थात बक्षीस मिळविण्यासाठी दिलेली माहिती खरी असणे आवश्यक आहे. या योजनेला अंतिम स्वरूप दिले जात असून त्यानंतर वित्त मंत्रींच्या मंजुरीनंतर त्या संदर्भातली घोषणा केली जाणार आहे.

Leave a Comment