रिलायन्सची आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसच्या प्री-बुकींगवर शानदार ऑफर


नवी दिल्ली : आपले आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन नुकतेच अ‍ॅपलने लॉन्च केले. भारतात या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग सुरू झाली असून रिलायन्स डिजिटलकडून हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.

हे फोन रिलायन्स डिजिटलकडून घेणा-या ग्राहकांना प्री-बुकींगवर कॅशबॅक आणि बायबॅकसारख्या ऑफर देत आहेत. बायबॅक ऑफरनुसार आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस एक वर्षाने परत केल्यास ७० टक्के पैसे परत दिले जातील. तर सिटी बँकच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० हजार रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे.

रिलायन्स डिजिटलच्या स्टोरमध्ये जाऊन नवीन आयफोन ऑफलाईन बुक करता येऊ शकतो. यासोबतच आयफोनची अ‍ॅमेझॉन, जिओ स्टोरवर सुद्धा ऑनलाईन बुकींग केली जाऊ शकते. भारतात या फोन्सची विक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होईल.

२७ ऑक्टोबरपासून आयफोन एक्स प्री-बुकींगसाठी उपलब्ध होईल आणि ३ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. आयफोन ८ साठी एक खास टेरिफ प्लॅन रिलायन्स जिओने लॉन्च केला आहे. त्यानुसार जिओ त्यांच्या प्रिपेड ग्राहकांना ७९९ रूपयांमध्ये ९० जीबी डेटा देणार आहे. यासोबत मोफत व्हॉईस कॉल्स, एसएमएस आणि जिओ प्रिमियमचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळेल.

Leave a Comment