भारतात ६५ लाख रूपये किमतीची पाणी बाटली लवकरच


भारतात लवकरच महागडी पाण्याची बाटली सादर केली जात असून तिची किंमत आहे लिटरला ६५ लाख रूपये. ही बाटली खरेदी करताना खूप जुनी मुरलेली वाईन खरेदी केल्याचा आनंद मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे. अर्थात तुम्ही ६५ लाख रूपये मोजले की लगेच ही बाटली तुमच्या हातात येणार नाही. प्रथम त्यासाठी ऑर्डर नोंदवावी लागेल. नंतर कंपनी थेट बेवर्ली हिल मधून ग्राहकापर्यंत ही बाटली पोहोचविणार आहे..

लग्झरी कलेक्शनच्या स्वरूपात ही बाटली सादर केली गेली आहे. तिचे बूच सोन्याचे असून त्यावर १४ कॅरेटचे ६०० पांढरे व २५० ब्लॅक डायमंड जडविले गेले आहेत. प्रत्येक बाटलीसाठी वेगळी केस असेल. बेवर्लीहिल ९० एचटूओ नावाने हे पाणी ग्राहकाला मिळणार आहे. कंपनीने या बाटल्यांचे १ वर्षांचे लाईफस्टाईल कलेक्शनही ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे असून तेथील उंच पहाडांतून वाहणार्‍या झर्‍यांचे पाणी या बाटलीतून विकले जाणार आहे.

Leave a Comment