अॅपल आयफोन १० ची प्रतीक्षा लांबणार


अॅपलच्या नव्या आयफोन १०च्या प्री ऑर्डरसाठी २७ आक्टोबरपासून बुकींग व ३ नोव्हेंबरपासून शिपिंग सुरू कले जाणार असल्याचे जाहीर केले गेले असले तरी प्रत्यक्षात बुकींग करणार्‍यांना आयफोन टेन उशीराच हाती पडतील असा दावा विश्लेषकांनी केला आहे. म्हणजेच सांगितलेल्या वेळेत हे फोन ग्राहकांना मिळू शकणार नाहीत.

विश्लेषक रेमंड जेम्स यांच्या म्हणण्यानुसार अॅपलच्या या फोनसंदर्भातल्या उत्पादन समस्या अजून सुटलेल्या नाहीत. या फोन्सचे फायनल प्रॉडक्शन अजून सुरूच झालेले नाही. ते आक्टोबर मध्यानंतर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे वेळेत फोन उपलब्ध करून देणे कंपनीला शक्य होणार नाही. एशिया सप्लाय चेन सोर्समधील खात्रीशीर सूत्रांकडून ही माहिती दिली गेली आहे. अन्य विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये ४ ते साडेचार कोटी आयफोन टेन शिपिंग केले जातील. मात्र मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ २०१८ मध्येच जुळू शकेल.

भारतात या फोनची किंमत ८९ हजार रूपयांच्या दरम्यान असून ही किंमत ६४ जीबी व्हर्जन साठीची आहे. तर याच व्हर्जनसाठी अमेरिकेत ६४ हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment