काही मिनिटांतच ट्विटरवर ट्रेंड झाला #RajThackerayOnFB हा हॅशटॅग


मुंबई : ट्विटरवर राज्यातील वलयांकीत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार ट्रेंड होत आहेत. फेसबुकवर राज ठाकरे यांनी ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि ट्विटरवर काही मिनिटांतच #RajThackerayOnFB हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

महाराष्ट्राला राज ठाकरे आणि चर्चा हे समीकरण नवीन नसल्यामुळे ठाकरे यांच्या फेसबुकवरील एंट्रीची गेले अनेक दिवस चर्चा रंगली होती. खासकरून ही चर्चा युवावर्गात विशेष होती. ठाकरे यांनी अखेर फेसबुकवर एंट्री केली आणि अपेक्षितपणे ती धडाकेबाजही ठरली. कारण ठाकरेंच्या पेजने चाडेचार लाख लाईक्सचा टप्पा पेज सुरू होताच अवघ्या काही तासात पार केल्यामुळे राज ठाकरे फेसबुकवर ट्रेंड तर झालेच. पण, हा ट्रेंड ट्विटरवरही मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला.

सध्या #RajThackerayOnFB या हॅशटॅगचा ट्विटरच्या भारतातील ट्रेंडमध्ये जोरदार बोलबाला आहे. भारतातील ट्विटर ट्रेंडवर #RajThackerayOnFB हा हॅशटॅग चौथ्या क्रमांकावर आहे. तो अल्पावधीतच पहिल्या क्रमांकावरही जाऊ शकतो असा अंदाज आहे.

Leave a Comment