अहमदाबाद : खिशाला परवडणारा आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या पाणीपुरी या चाट पदार्थाचा व्यवसाय कोट्यवधींचा असू शकतो याची कल्पना आपण कधीही केली नसेल. पण पाणीपुरीची अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधून वाढती मागणी लक्षात घेऊन या व्यवसायात १०० कोटी गुंतवण्याचा विचार अहमदाबाद येथील एका कंपनीने केला आहे.
‘इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट’ करणार पाणीपुरी व्यवसायात १०० कोटींची गुंतवणूक !
या कंपनीचे नाव ‘इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट’ असे असून ही कंपनी ‘शेअरइट’ या नावाने पाणीपुरी, पापड आणि पास्ताची आपली बाजारात विक्री करते. प्रसिद्ध आहेत. फक्त भारतातच नाही तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि मध्यपूर्वेतील देशांतूनही या कंपनींच्या पाणीपुरीला मोठी मागणी येऊ लागल्यामुळे वाढती मागणी लक्षात घेता या व्यवसायात २०२० पर्यंत १०० कोटींची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा विचार असल्याची माहिती कंपनीचे सहसंस्थापक अंकित हंसालिया यांनी डीएनए या वृत्तपत्राशी बोलताना दिली.
पाणीपुरी किट आणि मल्टीग्रेन पाणीपुरीची विक्री भविष्यात मध्यपूर्वेतील देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये करण्यासाठी कंपनीने आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांत आणि बांगलादेश, नेपाळमध्ये सध्याच्या घडीला या कंपनीच्या उत्पादनांची विक्री होते.