फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ला सुरुवात


मुंबई : आजपासून (बुधवार) ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टचा ‘बिग बिलयन सेल’ सुरु झाला असून २० सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत हा सेल असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गारमेंट, मोबाइलसह अनेक वस्तूंवर या सेलमध्ये भरघोस सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय यासारख्या अनेक ऑफर आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोनवर मोठी सूट देण्यात येत आहे.

टीव्ही, एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या अनेक वस्तूंवर या बंपर सेलमध्ये तब्बल ७०% सूट देण्यात आली आहे. मोटोरोला, एचटीसी, सॅमसंग ब्राँड्सच्या स्मार्टफोनवरही या सेलमध्ये डिस्काउंट देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये अॅपल आयपॉड, स्मार्टवॉच, सोनी प्ले स्टेशन यावरही अनेक ऑफर आहेत.

यासोबतच १२ हजारात ३२ इंच एलईडी टीव्ही सेलच्या पहिल्याच दिवशी खरेदी करता येणार आहे. वीयू कंपनीचा हा टीव्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर खरेदी करता येईल. फॅशन आणि गारमेंटच्या तब्बल ५०० प्रोडक्टचा या सेलमध्ये समावेश असणार आहे. दरम्यान, फ्लिपकार्टच्या या सेलनंतर अमेझॉनवर देखील उद्यापासून सेल सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी पर्वणीच आहे.

Leave a Comment