सरकारकडून मिळणाऱ्या व्यावसायिक कर्जासाठी असा करा अर्ज


नवी दिल्ली : तुम्ही जर तुमचा स्वत:चा नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल आणि तुमचा व्यवसाय पैशांअभावी रखडत असेल तर आता टेन्शन फ्री होऊन जा. कारण तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता सरकार तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे.

नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सरकार २५ लाखांपर्यंतचे कर्ज स्वस्त व्याज दराने देत आहे. हे कर्ज स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया(सीडबी)च्या स्माईल स्कीमनुसार दिले जात आहे. या योजनेनुसार सरकार दोन प्रकारचे कर्ज देत आहे. एक म्हणजे सर्व्हिस सेक्टरसाठी वेगळे कर्ज आणि मॅन्यूफॅक्चरिंगसाठी वेगळे लोन दिले जात आहे. तुम्हाला जर सर्व्हिस सेक्टरशी संबंधीत व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला १५ लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळेल आणि जर मॅन्यूफॅक्चरिंग व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला २५ लाख रूपयांपर्यंत कर्ज मिळेल.

या कर्जासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. पण अर्ज करण्याआधी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागेल. सरकार या कामातही तुमची मदत करू शकते. केवीआयसी आणि पीएमईजीपीच्या वेबसाईटवर अनेक प्रोजेक्ट फाईल्स सरकारने अपलोड केल्या आहेत. तुम्ही ते बघून तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करू शकता.
(दिलेल्या लिंकवर तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता)

Leave a Comment