पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीपर्यंत कमी होतील : धर्मेंद्र प्रधान


चंदिगढ : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येत्या दिवाळीपर्यंत पेट्रोल-डिझेलचे कमी होतील, असे वक्तव्य केले आहे. सर्वच स्तरातून पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर झालेल्या टीकेनंतर प्रधान यांनी ही माहिती दिली.

कच्च्या तेलाचे उत्पादन अमेरिकेत आलेल्या इरमा वादळामुळे १३ टक्क्यांनी घटले. इंधनाच्या किंमतींवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रधान यांनी सांगितले. तेल कंपन्यांचे मार्जिनही प्रमाणात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पेट्रोल-डिझेल सध्या जीएसटीच्या कक्षेत नाही. मात्र ते जीएसटी अंतर्गत आल्यास ग्राहकांनाच त्याचा फायदा होईल, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती उतरण्याची आशा आहे. म्हणजे किमान महिनाभर तरी इंधनामुळे वाहनचालकांच्या खिशाला चाट बसणार आहे. दररोज इंधनाचे दर बदलते ठेवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे विरोधकांसह सर्वसामान्य वाहनचालकांनी याविरोधात आवाज उठवला होता.

Leave a Comment