गूगलचे युपीआय बेस्ड पेमेंट ‘तेज’ अ‍ॅप लॉन्च


नवी दिल्ली : गूगलने डिजिटल पेमेंटचे महत्व ओळखून भारतात यूपीआय बेस्ड एक मोबाईल पेमेंट अ‍ॅप लॉन्च केले असून या अ‍ॅपचे नाव ‘तेज’ असे आहे. अ‍ॅन्ड्रॉईड आणि iOS दोन्हीसाठी हे अ‍ॅप उपलब्ध आहे.

एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय इत्यादी बॅंकांशी हे अ‍ॅप यूपीआयमुळे जोडलेले आहे. यूजर्स या अ‍ॅपच्या मदतीने थेट त्यांच्या बँक अकाऊंटमधून पेमेंट करू शकतील. यासाठी वेगळे खाते उघडण्याची अजिबात गरज नाही. यासोबतच या अ‍ॅपमध्ये एक कॅश मोडही आहे. ज्याच्या मदतीने कोणताही ‘तेज’ अ‍ॅप यूजर आजूबाजूला असलेल्या कोणत्याही ‘तेज’ अ‍ॅप यूजरला थेट पैसे पाठवू शकतो. यासाठी कोणतेही बँक डिटेल्स आणि फोन नंबर शेअर करण्याची गरज नाही. तसेच, या अ‍ॅपमध्ये QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करण्याची सुविधा आहे. गूगलने मायक्रोमॅक्स, पॅनासॉनिक, लावा आणि नोकिया सारख्या कंपन्यांना डिस्ट्रिब्यूशन पार्टनर बनवले आहे.

यूजर्सना यातही इतर पेमेंट वॉलेट्ससारखे स्क्रॅच कार्ड, रेफरल रिवॉर्ड आणि लकी संडे लकी ड्रॉसारखे ऑफर्स मिळतील. गुगलने हेही सांगितले आहे की, दुकानदार त्यांच्या अकांऊटमध्ये डिजिटल पेमेंट घेण्यासाठीही याचा वापर करू शकतात. ५० हजार रूपये प्रति महिना पैसे घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.

Leave a Comment