२२ सप्टेंबरपासून आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसची प्रीबुकिंग!


मुंबई : या महिन्यात भारतात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसची प्रीबुकिंग सुरू होणार असून सध्या ही बातमी अॅपलने अधिकृतरीत्या जाहीर केली नसली तरी काही वितरकांनी यासंबधीचा गौप्यस्फोट केला आहे. २२ सप्टेंबरपासून प्रीबुकिंग होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर २२ सप्टेंबरपासून या दोन्ही स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर प्रीबुकिंग करता येणार आहे.

फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरील लिस्टमध्ये आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे दोन्ही स्मार्टफोन दिसत आहेत. मध्यरात्री १२ वाजल्या पासून याची प्री ऑर्डर सुरू होणार आहे. या यादीनुसार आयफोन ८ स्पेस ग्रे, गोल्ड आणि सिल्वर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये ६४ जीबी आणि २५६ जीबी स्टोअर मेमरी असणार आहे. आयफोन ८ प्लसदेखील याच फिचर्ससह प्रीबुकींगसाठी उपलब्ध असणार आहे.

Leave a Comment