संशोधकांनी लावला मद्याचे व्यसन रोखणाऱ्या औषधाचा शोध


मेलबर्न – संशोधकांनी नुकताच मद्याचे व्यसन रोखणाऱ्या औषधाचा शोध लावला असून हे औषध रोज सायंकाळी दिल्यास मद्यपेयींचे व्यसन सुटू शकेल. ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी जॉन जेकब्सन याने मद्यपींची संख्या जगभरात मोठी असून मानवामध्ये मद्यपानानंतर कोणकोणते बदल होतात आणि त्यावर नियंत्रण कसे राखावे, या दृष्टीने आम्ही अनेक वर्षांपासून संशोधन करत होतो, असे सांगितले.

उंदराला मद्य दिल्यानंतर मद्याचे त्याचे व्यसन रोखण्यासाठी संशोधकांनी त्यावर या औषधाचा प्रयोग केला. प्रत्येक बदलानंतर आपले शरीर आणि मेंदू काही इशारा देत असतो. व्यसन रोखणारे हे औषध मद्यपानानंतर सेवन केल्यानंतरही मेंदूने काही इशारे दिले त्याची नोंद घेण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.

मानवी शरीरातील मेंदूची मद्यपान केल्यानंतर भूमिका तपासण्याचा आमचा प्रयत्न होता, असे जेकब्सन यांनी सांगितले. आम्ही तयार केलेले औषध मद्यपीला दिल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. सायंकाळी मद्यपान करण्याची मद्यपीला इच्छा झाली नाही, असेही जेकब्सन म्हणाले. ‘ब्रेन बिहेविअर अँड इम्युनिटी’ या मासिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment