‘या’ पर्यटनस्थळी पर्यटक येतात ‘ब्रा’ पाहण्यासाठी


कारड्रोना – तुम्हाला नक्कीच न्यूझीलंडच्या ब्राड्रोनामधील एक पर्यटन स्थळ बुचकाळ्यात पाडेल. तुम्हाला पर्यटकांच्या लांबच लाब रांगा येथे पहायला मिळतील. पण, एखाद्या ऐतिहासिक वास्तूसाठी हे पर्यटन स्थळ प्रसिध्द नाही. तर, येथे ‘ब्रा’ पाहण्यासाठी पर्यटक येतात. ‘ब्रा’ पाहण्यासाठी या पर्यटन स्थळी हजारो पर्यटक गर्दी करतात. तुम्हाला बऱ्याच टांगलेल्या ‘ब्रा’ या ठिकाणी पाहायला मिळतील.

याबाबत असे सांगितले जाते की, या ठिकाणाहून ४ महिला १९९९ साली प्रवास करत होत्या. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या पार्टीवरून त्या येत होत्या. त्यांनी त्या पार्टीत खूप मद्यप्राशन केल्यामुळे त्या नशेत होत्या. त्यांनी या नशेत स्वत:च्या ‘ब्रा’ काढल्या आणि या रस्त्याच्या कडेला टांगल्या. त्यांनी या ब्रा त्यांच्या वाहन चालकास बक्षीस म्हणून तिथे लटकवल्या होत्या. या ठिकाणी तेव्हापासून अशा पद्धतीने ब्रा लटकवण्याची प्रथाच सुरू झाली आहे. त्या बाजूला प्रवास करणाऱ्या महिला नेहमीच त्यांची ‘ब्रा’ या ठिकाणी लटकवतात. असे करण्यामागची मानसिकता काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

सुरुवातीला या कृत्याचा ‘ब्रा’ लटकवण्याच्या ठिकाणच्या गावातील स्थानिक नागरीक विरोध करत होते. प्रशासनाकडे ही या विरोधात आवाज उठवला. पण आजपर्यत ही प्रथा कोणी थांबवू शकले नाही. उलट हळू-हळू हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येत आहे. आता येथे रंगीबेरंगी ब्रा पाहण्यासाठी लांबून-लाबून येणाऱ्या पर्यटकांची येथे गर्दी जमते.

Leave a Comment