मुंबई : रिलायन्स जिओचे टेलिकॉम क्षेत्रात आगमन झाल्यापासून इंटरनेट डेटाबाबत टेलिकॉम क्षेत्रात प्राइसवॉर सुरु झाले असल्यामुळे एअरटेलने आता पुन्हा एकदा जिओला टक्कर देण्यासाठी आणखी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे.
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा धमाकेदार प्लॅन
कंपनीच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी हा प्लॅन असून ग्राहकांना यामध्ये ६ महिन्यांसाठी तब्बल ६० जीबी डेटा मोफत मिळणार आहे. म्हणजेच दर महिन्याला १० जीबी याप्रमाणे ६ महिन्याला ६० जीबी डेटा मिळणार आहे.
यूजर्सला ही ऑफर मिळवण्यासाठी फक्त ‘My Airtel App’डाऊनलोड करावे लागेल. अॅप डाऊनलोड केल्यावर एक पेज सुरु होईल. ज्यामध्ये फ्री डेटा प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. फक्त तीन सोपे टप्पे पार केल्यानंतर तुम्हाला तात्काळ ही ऑफर मिळेल.