अॅबी व्हॅलीच्या लिलावात केवळ २ च संभावित खरेदीदार


सहारा समुहाच्या लोणावळ्याजवळ असलेल्या आलिशान अँबी व्हॅलीच्या लिलावासाठी आत्तापर्यंत केवळ दोनच संभावितांनी केवायसी दाखल केली असल्याचे समजते. या लिलावासाठी आरक्षित मूल्य ३७३९२ कोटी आहे. लिलावाची प्रक्रिया आत्ताच सुरू झाली आहे व १० व ११ आक्टोबर रोजी हा लिलाव केला जाणार आहे.

ज्या दोन पार्टीनी या लिलावात रस दाखविला आहे त्यांची नांवे गुप्त ठेवण्यात आली आहेत. अँबी व्हॅलीमध्ये आधुनिक आलिशान व्हिलाज, गोल्फ कोर्स, रूग्णालये, शाळा, विमानतळासह अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी गुंतवणकदारांचे पैसे परत न केल्यामुळे त्यांना तिहार तुरूंगात बंद केले गेले असून त्यांच्या जामीनासाठी सुप्रीम कोर्टाने १५०० कोटी रूपये ७ सप्टेंबरपर्यंत सेबी सहारा खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यातील कांही रक्कम जमा केली आहे व उर्वरित रकमेसाठी आणखी मुदत द्यावी अशी याचिका रॉय यांच्यातर्फे न्यायालयात केली गेली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

Leave a Comment