मोदींच्या या चाहत्याकडे २ लाख फोटो, जागतिक रेकॉर्ड करणार


भारताचे पंतप्रधान मोदी यांनी १७ सप्टेंबरला त्यांचा ६७ वा वाढदिवस साजरा केला असून भारताच्या पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारून तीन वर्षे होताहेत तोपर्यंतच जगभरात मोदींच्या चाहत्यांची संख्या कोट्यावधींवर पोहोचली आहे. जयपूरचे मनमोहन अग्रवाल मोदींचे चाहते असून त्यांनी मोदींचे २ लाख फोटो जमविले आहेत.त्याचे प्रदर्शन त्यांनी नुकतेच मांडले होते. मोदींचे आणखी फोटेा जमवून जागतिक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न मनमोहन करत आहेत. त्यांना या रेकॉर्डची नोंद गिनिज बुकमध्ये करायची आहे.

भारतातही मोदींचे चाहते अनेक आहेत. बागपत येथील २५ वर्षीय नितिन याने स्वतःच्या रक्ताने मोदींचे पेटींग तयार केले आहे तर हरियाणातील जगाश्वरी रॅलीत मोदींच्या एका चाहत्याने डोक्याच्या मागचे केस मोदी हे नांव दिसेल या पद्धतीने कापून घेतले होते. मोदींच्या स्किल इंडिया मिशनचा प्रभाव पडलेल्या मेरठमधील एका आभियांत्रिकी विद्यार्थ्याने इलेक्ट्रीक बाईक तयार केली असून तिचा वेग आहे १५० ताशी किलोमीटर. वकार अहमद असे या विद्यार्थ्याचे नांव असून त्याने या बाईकचे नामकरण मोदी बाईक असे केले आहे.

Leave a Comment