तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सर्वांना प्रवेश पास सक्तीचा


मुंबई – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास सक्तीचा केला आहे. रविवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंदीर प्रशासनाने नवरात्रीपूर्वी हा निर्णय घेतल्यामुळे काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंदीरातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ट्रस्टच्या ठरावांनुसार याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे मंदीर व्यवस्थापक (तहसीलदार) सुनील पवार यांनी पत्रकारांना सांगितले.

दररविवारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रविवारी ज्यांच्याकडे पास नव्हते त्यांना अडविण्यात आले. धर्मशाळेतही पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता पासशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे मंदीर व्यवस्थापनाने सांगितले.

Leave a Comment