जाणून घ्या ‘राधे माँ’च्या बंगल्याची किंमत !


मुंबई : १४ भोंदूबाबांची यादी आखाडा परिषदेने जारी केली असून या यादीतील स्वतःला देवीचा अवतार सांगणा-या सुखविंदर कौर उर्फ राधे माँ विविध कारणांने वादग्रस्त ठरलेली आहे. मोह-मायेपासून जगाला दूर राहण्याचा उपदेश देणारी ही राधे स्वतःमात्र आलिशान राहणीमानात आपले जीवन जगते.

मुंबईच्या चिकूवाडीमधील नंद नंदन भवन नावाच्या अलिशान बंगल्यात राधे माँ राहते. तब्बल २५० कोटी ऐवढी या बंगल्याची आहे. ज्या खोलीत राधे माँ आपल्या भक्तांना भेटते, तिथे मखमली बेड, एसी, फॅन्सी लायटिंगसहित तमाम सुखसुविधा आहेत. भक्तांना ही राधे माँ एका खास खोलीत भेटते, ज्यात बेडशीटपासून ते पडद्यापर्यंत सर्वकाही लालेलाल असते. या खोलीतील राधे माँच्या आसनाच्या ठिक वर दुर्गादेवीची मूर्तीही आहे. राधे माँच्या सांगण्यानुसार ती आपल्या भक्तांच्या घरी राहते, परंतु मीडिया रिपोर्टनुसार, तिच्याकडे तब्बल १ हजार कोटींची संपत्ती असल्याचा आरोप आहे.