रिझर्व्ह बँकेचा राजीनामा शिकागो विद्यापीठामुळे नाही – राजन


रिझर्व्ह बँकेचा राजीनामा देण्यामागचे कारण शिकागो विद्यापीठाने सुट्या दिल्या नाहीत हे नव्हते, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. मला रिझर्व्ह बँकेत आणखी काही काळ असेही त्यांनी सांगितले.

“शिकागो विद्यापीठाने रजा वाढविणे, हा कधी मुद्दाच नव्हता. या विद्यापीठाची भूमिका माझ्याबाबतीत खूप चांगली होती. ते मला वाटेल तेवढी रजा देण्यास तयार होते,” असे पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले

बँकेच्या हिशेबांचे साफसफाईचे काम अर्धवट राहीले होते. ते मला पूर्ण करायचे होते. मात्र माझा कार्यकाळ वाढविण्याबाबत सरकारकडून प्रस्तावच मिळाला नाही. बँकिंग व्यवस्थेतील बुडालेल्या कर्जांची समस्या मला सोडवायची होती आणि त्यासाठी मला विस्तार हवा होता, मात्र त्यासाठी मी सरकारचा दरवाजा ठोठावला नाही, असे राजन यांनी सांगितले.