बंद झालेल्या नोटांची मोजणी यंत्राने नाही – रिझर्व्ह बँक


गेल्या वर्षी नोटाबंदी झाल्यानंतर बंद झालेल्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा मोजण्यासाठी यंत्रांचा उपयोग करण्यात आला नाही, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी किती कर्मचारी कामावर ठेवण्यात आले आहे, याची माहिती देण्यासही बँकेने नकार दिला आहे.

माहिती अधिकार कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जावर माहिती देताना बँकेने ही माहिती दिली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या बातमीदाराने 10 ऑगस्ट रोजी अर्ज दाखल करून ही माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना बँकेने आपल्या कुठल्याही कार्यालयात या नोटा मोजण्यासाठी यंत्रांचा वापर झाला नसल्याचे सांगितले आहे.

नोटांची मोजणी करण्याचे काम किती कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते, या प्रश्नाला उत्तर देताना बँकेने म्हटले आहे, की माहिती अधिकार अधिनियम, 2005 च्या कलम 7 (9) नुसार ही माहिती देता येणार नाही. नोटांची मोजणी कोणत्या दिवसापासून सुरू झाली, या प्रश्नाला “ती सतत चालू राहिली,” असे उत्तर बँकेने दिले आहे.

Leave a Comment