ऑडीची क्यू ७ पेट्रोल व्हर्जन कार लाँच


मुंबई : स्टेट्स सिम्बॉल ओळखल्या जाणाऱ्या ऑडीने आपली क्यू ७ पेट्रोल व्हर्जन ही नवी कार लाँच केली आहे. प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा दोन व्हेरिएंटमध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत अनुक्रमे ६७.७६ लाख आणि ७४.४३ लाख (एक्स शोरुम) आहे.

क्यू ७ च्या पेट्रोल व्हेरीएंटमध्ये २.० लिटर इंजिन आहे. तसेच यामध्ये २५२ पीएस आणि टॉर्क ३७० एनएम आहे. यामध्ये ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. हि कार ० ते १०० किमी वेग अवघ्या ६.८ सेंकदात घेते. ही कार ११.६८ किमी प्रति लीटर अॅव्हेरज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये ८ एअरबॅग, रिअर कॅमेरा व्हूय, आणि पार्किंग सिस्टम देण्यात आली आहे.

Leave a Comment