जिओमुळे इंटरनेट डेटा वापरण्यात भारत अव्वलस्थानी


नवी दिल्ली : रिलायन्स जिओने पदार्पणातच सर्वांना फ्री कॉलिंग आणि इंटरनेट देत ग्राहकांच्या पैशाचे गणीत जमवून दिल्यामुळे डेटा यूजचा भारतात जणू महापूरच आला. याचा परिणाम म्हणून मोबाईल डेटा वापरण्यात भारत १५५ व्या स्थानावरून थेट यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

रिलायन्स जिओ भारतीयांना इंटरनेटची त्यातही मोबाईल इंटरनेटची सवय लावण्यात आघाडीवर आहे. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल यांसारख्या कंपन्या नाही म्हणायला पूर्वी इंटरनेट सेवा द्यायच्या. पण ही सेवा घेण्यासाठी ग्राहकांना बराच पैसा खर्च करावा लागत होता.

दरम्यान, या क्षेत्रात रिलायन्स जिओने आगमन केले आणि भारतीयांच्या इंटरनेट डेटा वापरास काही धारबंदच राहिला नाही. महिन्याकाठी काही एमबीत डेटा खर्च करणारे भारतीय आता प्रतिमहिना काही कोटी जीबी वापरू लागले आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवर नजर टाकता भारत १५५व्या रॅंकवरून थेट पहिल्या स्थानावर आला आहे.

भारताने आजवर इंटरनेट डेटा वापरामध्ये आघाडीवर असलेल्या अमेरिका, चीनलाही मागे टाकले आहे. जिओ दावा करत आहे की, इंटरनेट डेटा वापरणाऱ्या एकूण भारतीयांपैकी १२५ कोटी जीबी डेटा वापरणारे फक्त रिलायन्सचेच ग्राहक आहेत.

Leave a Comment